नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज देशाचे ४६ सरन्यायधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात कार्यक्रम पार पडला आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती गोगोईंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम करणार आहेत. दीपक मिश्रा १ ऑक्टोबरला निवृत्त झाले आहेत. त्याआधी त्यांनी गोगोईंच्या नावाची शिफारस केल्यावर केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. काल गांधी जयंतीची सुटी असल्यानं गोगोई आज आपला पदभार स्वीकारानार आहेत. दीपक मिश्रा होते तेव्हा अनेक वाद निर्माण झाले तर अनेक इतिहास घडवणारे निर्णय देखील सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे.