Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिस अमेरिका स्पर्धेत मोठा बदल, बिकीनी हद्दपार

miss america
, गुरूवार, 7 जून 2018 (15:15 IST)
यावर्षीपासून मिस अमेरिका स्पर्धेतून बिकीनी हद्दपार होणार आहे. या स्पर्धेतल्या स्पर्धकांना त्यांच्या फक्त शारीरिक मापांवर जोखलं जाणार नाही, तर त्यांची बुद्धीमत्ता, त्यांचं यश आणि त्यांचे भविष्यातल्य़ा योजना, यांचाही विचार यंदाच्या वर्षीपासून केला जाणार आहे.काही स्पर्धकांनी बिकीनी राऊण्डमध्ये अवघडल्यासारखं होत असल्याची तक्रारही केली होती. यंदा या स्पर्धेच्या आयोजक तीनही महिलाच आहेत. आयोजक आणि स्पर्धत यांनी एकत्रितपणे बिकीनीला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
मिस अमेरिका स्पर्धेत यंदाच्या वर्षीपासून बिकीनी राऊण्डऐवजी पॅनल इंटरव्ह्यू अर्थात स्पर्धकाची मुलाखत घेतली जाणार आहे. मात्र या स्पर्धेतला इव्हिनिंग गाऊन राऊण्ड कायम असणार आहे. मिस अमेरिका या स्पर्धेला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एल्गार परिषदेचे आयोजक ढवळेंसह चौघांना अटक