Publish Date: Fri, 04 Sep 2020 (11:37 IST)
Updated Date: Fri, 04 Sep 2020 (11:41 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना रणौतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही कंगनाच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे.
दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही अशी असंही ते म्हणाले आहेत.
मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे.