भारताच्या संसद भवनात सध्या प्रचंड गदरोळ सुरू आहे मात्र पाकिस्तानच्या संसद भवनात वेगळेच वातावरण आहे. पाकिस्तानच्या संसदेत खासदार आणि स्पीकर यांच्यात कोणताही तणाव नाही, वादविवाद नाही, उलट खासदार स्पीकरला डोळ्यात पाहून ऐकण्यासाठी आवाहन करत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानच्या संसदेचा आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि पाकिस्तानी नेते जरताज गुल, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक यांच्यात संभाषण सुरू आहे. खासदार जरताज गुल सभापतींना म्हणाल्या, 'स्पीकर साहेब, मला तुमचे लक्ष हवे आहे.' स्पीकर म्हणाले- हो प्लीज.
महिला खासदार जरताज गुल यांनी स्पीकरला सांगितले की, 'माझ्या नेत्याने मला डोळ्यात बघून बोलायला शिकवले आहे. सर, जर माझ्याशी आय कॉन्टॅक्ट केला नाही तर मी बोलू शकणार नाही. यानंतर महिला खासदार म्हणाल्या, साहेब हवं तर चष्मा लावा. त्यावर सभापतींनी दिलेले उत्तर ऐकून सभागृहात हशा पिकला.
स्पीकर म्हणाले मी पाहू शकत नाही, मी तुम्हाला ऐकेन. स्त्रियांशी आय कॉन्टॅक्ट चांगले वाटत नाही. हसत हसत ते पुढे म्हणाले की मला कोणत्याही स्त्रीच्या डोळ्यात बघत नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून खुद्द खासदारांनाही हसू आवरता आले नाही. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही लोक ते मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
सोशल मीडिया यूजर यावर मजेदार कमेट्स करत आहे.