पालघर जिल्ह्यातील टाकवहाल गावात एक म्हैस आणि तिचं रेडकू सध्या चर्चेत आहे. कारण आहे काळ्या म्हशीच्या पांढऱ्या शुभ्र रेडकाचा जन्म. म्हैस म्हटली की डोळ्या समोर येते काळ्या रंगाचं प्राणी. पालघरच्या जिल्ह्यात टाकवहाल गावात राहणारे समीर पटेल यांच्या काळ्या म्हशीने पांढऱ्या शुभ्र रेडक्याला जन्म दिला आहे. काळ्या म्हशीच्या पांढऱ्या शुभ्र रेडक्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे. हे रेडकू एकदम स्वस्थ असल्याची माहिती समीर पटेल यांनी दिली आहे. पांढऱ्या रेडकाचं जन्म होणं ही दुर्मिळ असून पटेल कुटुंब रेडक्याची काळजी घेत आहे.
मुंबई अहमदाबाद मार्गावर टेन ग्राम पंचायतच्या हद्दीत टाकवहाल गावात दुधाचा व्यवसाय करणारे समीर पटेल ह्यांच्या घरात म्हशी आहे. त्यापैकी एका म्हशीने चांगल्या पांढऱ्या शुभ्र पिल्लाला जन्म दिल्याने हे कौतुकाचा विषय बनला आहे. हे पिल्लू पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळतं आहे.