Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय भावाशी पराभूत होऊन रडू लागली पंकजा मुंडे... जाणून घ्या व्हायरल फोटोबद्दल सत्य...

webdunia
सोशल मीडियावर महाराष्ट्राची मंत्री आणि भाजप नेता पंकजा मुंडे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवामुळे पंकजा कॅमेर्‍यासमोर रडू लागली. पंकजा यांना त्यांच्या चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला आहे.
 
काय होत आहे व्हायरल-
ट्विटरवर अनेक यूजर्स न्यूज एजेंसी आयएएनएस एक ट्विट शेअर करत आहे ज्यात लिहिले आहे की भाजपची नेता आणि महाराष्ट्राची मंत्री पंकजा मुंडे परळी सीटवरुन आपल्या भावासमोर मिळालेल्या पराभवानंतर रडू लागली. आयएएनएसने या ट्विटसोबत पंकजा मुंडे यांचा फोटो देखील शेअर केला आहे ज्यात ती रडताना दिसत आहे. अनेक मीडिया हाउसने या ट्विटच्या आधारावर बातमी प्रकाशित केली आहे.
webdunia
काय आहे सत्य-
सर्वात आधी आम्ही पंकजा मुंडे यांचा रडत असलेला फोटो रिव्हर्स सर्च केल्यास काही विशेष परिणाम सापडले नाही.
 
तसेच पंकजा मुंडे यांच्या व्हायरल फोटोत TV9 चा माइक दिसत आहे, तर आम्ही हा फोटोशी निगडित व्हिडिओ शोधणे सुरू केले. आम्हाला TV9 मराठीच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ सापडला, ज्यात कव्हर फोटो व्हायरल फोटोशी जुळत होता.
 
हा व्हिडिओ 21 ऑक्टोबर रोजी पोस्ट केला गेला होता. परंतू पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर स्पष्ट झाले की पंकजाची व्हायरल फोटो या व्हिडिओतून घेण्यात आली आहे. परंतू यात पंकजा कुठेही रडताना दिसत नाहीये. या व्हिडिओत त्या धनंजय मुंडे द्वारे त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत होती.
 
तसं तर, एनसीपी नेता यांनी म्हटले की व्हायरल व्हिडिओसोबत छेड केली गेली असून तो फेक आहे. त्यांचे वक्तव्य तोडून-मोडून प्रस्तुत केले गेले आहे.
 
आम्ही TV9 मराठी यूट्यूब चॅनलवर पंकजा मुंडे यांचा 24 ऑक्टोबरला पोस्ट केलेला व्हिडिओ बघितला ज्यात त्या धनंजय मुंडे यांच्याकडून मिळालेल्या पराभवाला स्वीकारात दिसत होत्या. या व्हिडिओत त्यांनी गुलाबी रंगाची कुर्ती घातलेली होती.
 
आम्ही व्हायरल आयएएनएसचे ट्विट देखील सर्च केल्यास आम्हाला ट्विट सापडलं नाही. अनेक यूजर्सने याबद्दल पुढाकार घेतल्यामुळे आयएएनएसने आपली चूक मान्य करत व्हायरल ट्विट डिलीट केला होता.
 
वेबदुनियाला आढळून आले की पंकजा मुंडे यांची व्हायरल फोटो जुनी आहे आणि त्या फोटोत रडत नसून फोटो चुकीच्या संदर्भात शेअर करण्यात आला आहे.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

नव्या विधानसभेत २३ महिला आमदार करणार मतदारसंघाच प्रतिनिधित्व