प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होऊ शकतो असे संकेत मिळाल्यावर यावर चर्चा सुरू आहे की काय खरंच 100 वर्षाहून अधिक जुन्या प्लाझ्मा उपचाराने कोरोनावर उपचार करता येऊ शकतो.
काय आहे हे प्लाझ्मा थेरपी
आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षांपूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिल वॉन बेह्रिंग यांनी लावलं होतं. या साठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते. प्लाझ्मा उपचार किंवा थेरपी कोरोना व्हायरस म्हणजे कोविड 19 चा उपचार करू शकेल. या पूर्वी सार्स(2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. हे कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात.
प्लाझ्मा तंत्रज्ञान
आपल्या शरीरामधील रक्ताचे 4 मुख्य घटक लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा हे रक्ताचा द्रव भाग आहे. ह्या प्लाझ्माच्या साहाय्याने, आवश्यकतेनुसार अँटीबॉडीज तयार केलं जातं. कोरोनाच्या आक्रमणानंतर आपलं शरीरं विषाणूंविरुद्ध लढायला सुरुवात करते. प्लाझ्माच्या साहाय्याने तयार अँटीबॉडीज याला लढा देतात. शरीरात पुरेश्या अँटीबॉडीज बनल्या तरच कोरोनाचा नायनाट होऊ शकतो. रुग्ण बरा झाल्यावर हे शरीरातील अँटीबॉडीज प्लाझ्मासह डोनेट करता येतात.
उपचार
कोरोना संसर्ग झाल्यावर एखादा रुग्ण बरा झाल्यावर त्याचा शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात. या अँटीबॉडीज त्याला बरं होण्यासाठी साहाय्य असतात. जी व्यक्ती रक्तदान करते, त्याचा रक्तांमधून प्लाझ्मा काढला जातो आणि जेव्हा प्लाझ्मामध्ये आढळणारे अँटीबॉडीज आजारी माणसापर्यंत पोहोचतात त्याने आजारी माणसाला बरं होण्यास मदत होते. एका व्यक्तीकडून काढलेल्या प्लाझ्माच्या चा मदतीमुळे 2 लोकांवर उपचार करणे शक्य असल्याचे सांगितलं जातं. डोनरच्या कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याच्या दोन आठवड्यानंतर ती व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते.
प्लाझ्मा उपचार किती प्रभावी
प्लाझ्माचा उपचार किती प्रभावी असणार हे स्पष्टपणे सांगता येणार नाही पण चीनमधील काही रुग्णांना ह्या थेरपीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना ह्या थेरपीचा चांगला फायदा झाला असल्याचे समजत आहे. ह्याच बरोबर 3 भारतीय अमेरिकन रुग्णांना देखील या प्लाझ्मा थेरपीचा चांगला फायदा झाल्याचे कळून आले आहे. आपल्या भारतामध्ये देखील दिल्ली मध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्णाला या प्लाझ्मा थेरपीचा फायदा झाला आहे. त्याचा स्थितीमध्ये सुधार होऊन आता त्याला व्हेंटीलेटर वरून काढण्यात आले आहे आणि आता त्याचा प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहे.