Publish Date: Sat, 24 Nov 2018 (16:10 IST)
Updated Date: Sat, 24 Nov 2018 (16:18 IST)
शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारविरोधात पवित्रा घेतला आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंच्याच आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या वक्तव्यावरुन मनसेने त्यांना पुन्हा एकदा छेडले आहे.
webdunia
Publish Date: Sat, 24 Nov 2018 (16:10 IST)
Updated Date: Sat, 24 Nov 2018 (16:18 IST)