Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
, बुधवार, 20 जून 2018 (10:05 IST)
जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी इथे राज्यपाल राजवट लागू करण्यास परवानगी दिली आहे. पुढचे सहा महिने इथे राज्यपाल राजवट लागू असेल. भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर इथलं पीडीपीचं सरकार कोसळलं होतं.
 
पीडीपी सरकारमधून बाहेर पडताना भाजपने जम्मू-कश्मिरात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही राज्यपालांची भेट घेऊन पीडीपीला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे जम्मू-कश्मिरात राज्यपाल राजवट अटळ होती. राज्यपाल एन.एन. वोरा मंगळवारी यांनी रात्री उशिरा केंद्र सरकारकडे अहवाल पाठविला तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपाल राजवटीची शिफारस केली होती. राष्ट्रपती विदेश दौऱ्यावर असल्याने मंगळवारी हा निर्णय होऊ शकला नव्हता. घटनेने जम्मू-कश्मिरला सेक्शन ९२ नुसार येथे राज्यपाल राजवट लागू करण्याचे विशेष अधिकार दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रिटनच्या राजघराण्यात ऐतिहासिक 'समलैंगिक' विवाह