Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष
, सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (11:06 IST)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना सिडनी विमानतळावर करावा लागला. शिल्पाने आपल्या सोशल अकाऊंट एक भलीमोठी पोस्ट लिहून, झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.  
 
‘सिडनीवरून मेलबर्नला जात असताना चेक इन काऊंटरवर मेल नावाच्या महिलेशी माझी गाठ पडली. आमच्यासारख्या (कृष्णवर्णी) लोकांसोबत असेच वागायला हवे, असाच तिचा तोरा होता. मी बिझनेस क्लासने प्रवास करत होते. माझ्या जवळ दोन बॅग होत्या. माझी बॅग पाहताच, ती ओव्हर साईज असल्याचा अंदाज तिने काढला आणि मला दुस-या काऊंटरवर पाठवले. त्या काऊंटरवरच्या शालीन महिलेने माझी बॅग ओव्हर साईज नसल्याचे सांगितले. पण आणखी एका काऊंटरवर मॅन्युअली चेक करू शकता, असेही ती म्हणाली. काऊंटर बंद व्हायला केवळ ५ मिनिटे उरली होती. आम्ही पुन्हा त्या मेल मॅडमजवळ गेलोत आणि बॅग जमा करण्याची विनंती केली. पण तिने तसे करण्यास नकार दिला. या सगळ्या प्रकाराबद्दल आम्ही नाराजी व्यक्त करताच, तिने आम्हाला असभ्य वागणूक देणे सुरू केले. वेळ नसल्याने आम्ही पुन्हा एकदा लगेज काऊंटरवर गेलोत आणि त्यांना बॅग जमा करण्याची विनंती केली. त्यांनी आमची विनंती मान्य केली. फोटोत पाहा, काय माझी बॅग ओव्हर साईज आहे?,’ असे शिल्पाने पोस्टमध्ये लिहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडले