Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता लक्ष राज्यपालांकड, मात्र ते मूळ गुजरातचे

आता लक्ष राज्यपालांकड, मात्र ते  मूळ गुजरातचे
, मंगळवार, 15 मे 2018 (17:28 IST)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी सत्ता स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. कारण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार असं चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातच जेडीएसनं काँग्रेसची ऑफर स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करू असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रण द्यायचं हे आता कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर आहे. विशेष म्हणजे ते वजुभाई वाला हे मूळ गुजरातचे आहेत. त्यामुळेच सत्तेच्या चाव्या या गुजरातकडेच असल्याचं म्हणलं जात आहे.

भाजपच्या विजयी आणि आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांचा आकाडा ११३वर पोहोचला होता. त्यामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण होतं. मात्र काही वेळात हा आकडा १०४ इतका खाली आला. त्याच दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आपल्या सोबत घेतलं. ते एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. गोव्यात भाजपनं अशीच खेळी केली होती.आता सगळं लक्ष राज्यपालांकडे लागलं आहे. मात्र संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निमंत्रण देणार नाही, असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसचे JDS ला समर्थन