Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

मुकेश अंबानी यांचा ड्रायवर कमावतो इतका पगार

salary

आपल्या देशातील रिलायन्स समुहाचे अध्यक्ष   मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी हे  जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. तर  मुकेश अंबानी यांचं घर ते  देखील राजमहलासारखं आहे. जगातील महागड्या घरांमध्ये त्यांच्या घराचा नंबर लागतो. सोबत त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असे  मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वात महागडी कार आहे. मात्र या त्यांच्या  गाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची सॅलरी पगार एकला तर तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या वृत्त्नुसार , मुंकेश अंबानी त्यांच्या ड्रायवर्सला प्रत्येक महिन्याला खूप चांगला आणि  मोठा पगार देतात. एका ड्रायव्हरचा एका महिन्यांचा पगार 2 लाखापेक्षा अधिक आहे. मात्र सर्वत्र जर आपण पाहिले तर  एका ड्रायव्हरची सॅलरी 20 हजारापर्यंत असते.  तर मुकेश अंबानी यांचा ड्रायव्हर बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. मुकेश अंबानी यांचा ड्राईव्हर निवडण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी त्यांच्या ड्राईव्हरची निवड करते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ड्राईव्हरला मुकेश अंबानी यांची गाडी चालवण्यासाठी पाठवलं जातं, त्यामुळे हा एक चांगला करिअर मार्ग होऊ शकतो.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट