सध्या रस्त्यावर खाण्याच्या बऱ्याच दुकानी असतात. नवनवीन खाद्य पदार्थ बनवून विकणारे रस्त्यावरील विक्रेते हे देशभरात नवीन प्रयोग करत असतात. काही जण नवीन पदार्थ करण्याच्या उत्साहात दोन पदार्थ एकत्र करून एका नवीन खाद्य पदार्थाचा शोध लावून आपल्या ग्राहकांवर त्याचा प्रयोग करत असतात. नवीन खाद्य पदार्थ शोधण्याच्या नादात अनेक वेळा त्यांना अपयश हाती येतं तर काही वेळा यश देखील मिळतं.
सध्या रस्त्यावरील अनेक खाद्य पदार्थ विक्रेते मॅगी पासून नवीन प्रयोग करताना सोशल मीडियावर दिसत आहे. मॅगी पासून आईस्क्रीम बनवताना देखील दिसले आहे .आता उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम आला असून सध्या सोशल मीडियावर मँगोची मॅगी चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या फूड व्लॉगिंग इंस्टाग्राम पेजवरून हा एक व्हिडिओ समोर आला आहे,
ज्यामध्ये एक महिला मॅगी बनवताना दिसत आहे. ज्यामध्ये ती महिला एका मोठ्या तव्यावर तूप घालून त्यावर मॅगीचे पॅकेट फोडून मॅगीचा मसाला टाकते आणि त्यात थोडं पाणी घालून त्यावर मॅगीचे तुकडे टाकते नंतर ही महिला मॅगी शिजवायला पाण्याच्या ऐवजी चक्क मँगो ड्रिंक मिसळते.मॅगी तयार झाल्यावर ती मॅगी प्लेट मध्ये काढून त्यावर आंब्याचे तुकडे घालून सर्व्ह करते. हा व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच संतापले आहे.