ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचं निधन झालं आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. विचारवंत, लेखक, मालिका निर्माते, ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते.
हरी रामचंद्र नरके यांचा जन्म 1 जून 1963 साली झाला.ते एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून त्याची ओळख होती.
पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं . महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता पण त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हाही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली आहे.
हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे 37 ग्रंथ प्रकाशित झाले होते. महात्मा फुले साहित्याच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादांच्या खंडाचे ते संपादक होतो. 60 विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती असं समजत आहे आज ते पुण्याहून मुंबईकडे निघालेले असताना त्यांना गाडीत त्रास सुरू झाला मग एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना नेण्यात आलं तिथेच त्यांचं निधन झालं
“हरी नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांची फोटोग्राफी प्रसिद्ध केली. त्यांनी छान पुस्तकं तयार केली. महात्मा फुल्याचं मूळ चित्र शोधून काढलं, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, हरी नरके आमचा वैचारिक पाठिंबा होता. अलीकडे आरक्षणाच्या बाबतीत ते माहिती पुरवायचे. बोलण्याच्या पलीकडे आहे हे सगळीकडे.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.