अन्नामध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. कधी आईस्क्रीम मध्ये माणसाचे कापलेले बोट आढळले आहे तर कधी मृत प्राणी आढळला आहे. आता आईस्क्रीम मधून चक्क मृत साप आढळले आहे. हे प्रकरण थायलंडचे आहे.
एका ग्राहकाने आईस्क्रीम खरेदी केली आणि त्याला खाण्यासाठी उघडल्यावर त्यात चक्क मृत साप गोठलेला आढळला.त्याने आईस्क्रीमचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केले.त्यात त्याने लिहिले होते" तुझे डोळे खूप सुंदर आहे, तू असा कसा मरु शकतोस ? हा फोटो मूळ आहे कारण मीच हे आईस्क्रीम विकत घेतले आहे.
हे प्रकरण थायलंडचे असून थायलंडच्या मुआंग रत्चाबुरी भागातील 'रेबान नाकलेआंगबून' नावाच्या व्यक्तीने ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्या माणसाने सांगितले की त्याने ते ब्लॅक बीन आईस्क्रीम बारमधून विकत घेतले होते. जेव्हा त्याने ते खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. मात्र, भीतीपोटी आईस्क्रीम फेकून देण्याऐवजी त्या माणसाने त्याचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
या फोटोवर लोकांची प्रतिक्रिया येत आहे. काहींचे म्हणणे आहे की, हा काळा पिवळा साप विषारी होता तर काही याला लहान झाडावर राहणारा साप म्हणत आहे. हे लोकांच्या जीवाशी खेळणे असल्याचे काहींचे म्हणणे आहे.या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.