समुद्रातून अनेकदा मौल्यवान वस्तू बाहेर पडत असल्याच्या घटना आपण वाचत असतो. कधी दुर्मीळ मासे तर कधी काय सापडत असतं. ही घटना थायलंडची असून येथील एका मासेमारी करणार्या व्यक्तीला दुर्मीळ मोती सापडला आहे.
37 वर्षीय हातचाय निओमेडेचा नावाच्या माणसाला कोट्यावधी रुपयांचा मोती सापडला आहे. समुद्रा किनार्यावर मोती सापडल्यावर त्या आपल्या भावाला बोलावून दाखवला. मोती एका शिंपल्यात होता. नंतर मोती घरी नेऊन त्याने आपल्या वडिलांना दाखवला. त्यांच्या वडिलांनी शिंपल्याच्या आता बघितले आणि हैराण झाले. त्यांना एक नारंगी रंगाचा मोती सापडला. ज्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
हातचाय यांनी सांगितले की एका वयोवृद्ध व्यक्तीने समुद्रा किनार्यावर बोलावलं होतं. आणि माझं भाग्य मला मोत्यापर्यंत घेऊन आलं. आता तो मोती जास्त किंमतीला विकण्याचा प्रत्यन करेल. जेणेकरुन कुटुंबाचं नशीब बदलेल. त्यांना या मोत्याला 10 मिलियन थाई बात म्हणजे 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक इतकी किंमत मिळावी अशी अपेक्षा आहे.