आपण बऱ्याच वेळा रस्त्यावरून जातांना प्राणी रोड क्रॉस करताना पहिलेच असणार. बऱ्याच वेळा धडक लागून हे निष्पाप जीव आपले प्राण गमावतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या कारच्या धडकेत जखमी झाला आहे. धडकल्यानंतर भयंकर बिबट्या दूर पडण्याऐवजी कारच्या पुढील भागात बॉनेट मध्ये धोकादायकरित्या अडकला.
बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. सुशांत नंदाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या दुसऱ्या व्हिडीओमध्ये अपघातानंतरही बिबट्या गाडीच्या बोनेटमधून पळून जंगलाकडे पळताना दिसत आहे. बिबट्याचे हे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.