सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे ज्यात लोक बेकरीमध्ये ब्रेड आणि टोस्ट पॅक करत आहेत आणि त्यावर थुंकताना दिसत आहेत. पॅकिंगची ही निकृष्ट शैली पाहून लोकही संतापले आहेत.
व्हिडीओत दिसत आहे की ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावर पाय ठेवून बसले आहेत. ट्रेवर पाय चुकीने पडला नसून मुद्दामहून ठेवला आहे कळून येत आहे.
एका कामगार टोस्टवर पुन्हा पुन्हा पाय मारताना दिसत आहे. नंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकून, चाटून पॅक करत आहे.
हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण हे बघितल्यावर बाहेरचे ब्रेड आणि टोस्ट खाण्याची इच्छा मात्र मरुन जाईल.