Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

तिरुपतीचे नियोजन करताय, मंदिर पूर्ण बंद राहणार

tirutpati
, शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:34 IST)
तुम्ही तिरुपती बालाजीला जाणार आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वर्षात पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांना घेता येणार नाही. मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात तिरुपती बालाजी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा विचार तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) करत आहे. यामागे धार्मिक कारण आहे. प्रत्येक 12 वर्षांनी ‘अघमास’येतो त्यालाच ‘अस्ताबंधना बाललया महासंपरोकषनाम’असे देखील म्हटले जाते. ‘अघमास’ यंदा 12 ते 16 ऑगस्ट या काळात होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन हा निर्णय घेणार आहे. मंदिरात प्रत्येक दिवशी 30 ते 35 हजार भक्त दर्शनासाठी येतात. पण ‘अघमास’दरम्यानच्या सर्व पूजा आणि दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भक्तांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन करताना याचा विचार करावा, असे ‘टीटीडी’ने स्पष्ट केले आहे. देवस्थानाने या आधीच 12 ते 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व अर्जिता सेवा रद्द केल्या. त्यामुळे मंदिर बंद राहणार हे उघड आहे. 
 
होणाऱ्या हा धार्मिक विधी 1958 पासून करण्यात येत आहे. प्रत्येक 12 वर्षांनी होणारी ही विशेष पूजा आहे. तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबाला दिर्घ आयुष्य मिळावे, अशी प्रार्थना करण्यात येते.  तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व शक्ती एका पात्रात जमा होते. या काळात हे पात्र यज्ञशाळेत ठेवले जाते. ‘महासंपरोकषनाम’ची तयारी 20 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे. त्यामुळे नियोजन असेल तर विचार करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिडको जमीन व्यवहार प्रकरणात न्यायालयीन चौकशी व्हावी - अजित पवार