डेटिंग अॅप्स कामास आले नाहीत म्हणून एका तरुणाने आपल्यासाठी प्रेयसी शोधण्यासाठी अशी युक्ती लढवली की तो ट्विटरवर चर्चेचा विषय ठरला. त्याने एका बिलबोर्डावर जाहिरात दिली. यात त्याने स्वत:ला सिंगल सांगत डेट करू इच्छित मुलींनी संपर्क करावा असे म्हटले आहे. यानंतर या व्यक्तीकडे 100 हून अधिक प्रस्ताव आले आहेत.
एका मीडिया रिपोर्टप्रमाणे मार्क रोफने सर्व डेटिंग अॅप्स वापरून झाल्यावर प्रेयसी शोधण्यासाठी ही युक्ती लढवली. बिलबोर्डावर आपली जाहिरात देण्यासाठी त्याने सुमारे 40,000 रुपये खर्च केले. मार्कने यूकेच्या मेनचेस्टरच्या अधिकाधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर लागलेल्या या बिलबोर्डावर आपली जाहिरात दिली.
यात मार्कचा पसरलेला एक फोटो आहे सोबतच ''सिंगल? हे ते साइन आहे ज्याची आपण वाट बघत आहात असे लिहिले आहे''. सोबतच मार्कने आपल्या ट्विटर हँडलवर बिलबोर्डाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत मार्कने लिहिले- मी आता एक बिलबोर्डावर आहे परंतू याआधी मी केस कापवले नाही याचे दु:ख आहे.
मार्कच्या या ट्वीटवर अनेक लोकांचे कमेंट्स आले आहे. अनेकांनी त्याला बेस्ट ऑफ लक विश केले तर अनेक त्याच्या या युक्तीचं कौतुक करत आहे.
मार्कने म्हटले की मी प्रेमाचा शोध घेत दमलो आणि माझ्या मित्राला बिलबोर्डावर जाहिरात द्यावी अस म्हणून हसत होतो परंतू नंतर मला वाटले की हा आयडिया वाईट नाही. मी वेडा असल्याचं अनेकांना वाटत असेल कारण यासाठी 40 हजार रुपये खर्च करावे लागले परंतू जर मला आपलं प्रेम सापडलं तर ही डील महागात पडली असे वाटणार नाही. मी याला फनी बनवण्याच प्रयत्न केला आहे याने कदाचित मला माझं प्रेम मिळून जाईल.