इंटरनेटवर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता अशावेळी एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ असा आहे की तो पाहिल्यानंतर तुमचे हसू आवरता येणार नाही. खरंतर हा व्हिडिओ एका न्यूज चॅनलचा आहे जिथे लाइव्ह डिबेट शोमध्ये जे घडलं ते पाहून लोक हसत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पॅनेलच्या सदस्याला बोलण्याची संधी दिली गेली नाही, त्यानंतर त्याने आपला आवाज ऐकावी म्हणून आश्चर्यचकित करणारे कृत्य केले. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाइव्ह डिबेट दरम्यान एका महिला पॅनेलच्या सदस्याला बोलण्याची संधी दिली जात नव्हती, तेव्हा ती मध्येच उभी राहून नाचू लागली आणि विचित्र चेहरेही करू लागली. जेणेकरून लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले जाईल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पॅनेलची सदस्य बोलण्याचा प्रयत्न करत असताना चर्चेत सहभागी झालेल्या न्यूज अँकर आणि इतर पाहुण्यांनी तिला थांबवले.