Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठ वर्षांपासून नवरा-बायको म्हणून वावरत होते दोन पुरुष

webdunia
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (13:47 IST)
मध्यप्रदेशाच्या सीहोर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका घटनेत एक दंपतीचा जळून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. दोघांचा पोस्टमॉर्टम रिर्पोट आल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नवरा-बायको म्हणून वावरणारे दंपती दोघेही पुरुष होते. 
 
प्राप्त माहितीनुसार शुजालपुर रहिवासी विक्रम सिंह मेवाडाला कालापीपल भेसवा रहिवासी एक तरुणाच्या प्रेमात पडला. दोघांनी 2012 मध्ये सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नासाठी एका तरुणाच्या कुटुंबाने होकार दिला असला तरी दुसर्‍याच्या कुटुंबाने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. प्रेम विवाहानंतर दोघे सीहोर येथे राहू लागले. लग्नानंतर पत्नीच्या रुपात राहणार्‍या तरुणाचे नाव देवकुंवर असे ठेवण्यात आलं. दोन वर्षांनी कुटुंबाने अपत्तयासाठी दबाव आणाला तेव्हा दोघांना त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं.
 
11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री दोघांमध्ये काही कारणामुळे वाद झाल्यामुळे महिलेच्या रुपात राहणार्‍या तरुणाने स्वत:ला पेटवून घेतलं. दुसरा तरुण त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पेटला. दोघांना भोपाळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे दोघांचा चार दिवसाच्या अंतराळात मृत्यू झाला.
 
मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर पोलिस देखील हैराण झाली. त्यावरुन कळून आले की पत्नीच्या रुपात राहणारा पुरुष होतो आणि दोघे पुरुष मागील आठ वर्षांपासून पती-पत्नीच्या सोबत राहत होते.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

भारत - चीन सीमावाद : युद्ध जिंकूनही चीनने अरुणाचल प्रदेशातून माघार का घेतली होती?