व्हॉट्सअॅपवर एक असाही मेसेज व्हायरल होत आहे ज्यामुळे काही सेकंदासाठी व्हॉट्सअॅप हॅंग होत आहे. त्यामध्ये असं लिहण्यात आले आहे की जर ब्लॅक पॉईंटवर क्लिक केले तर तुमचे व्हॉट्सअॅप हॅंग होईल. त्या ब्लॅक आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अॅप फ्रीज होते. काही रिपोर्ट्सनुसार, मेसेज थ्रेड अॅपच्या टेक्स्ट आणि ब्लॅक डोटमधील अंतरामुळे क्रॅश होत आहे.या मेसेजला HTML मध्ये कन्वर्ट टेक्स्टमध्ये राईट टू लेफ्ट मार्क असल्याचे समजून येत आहे. हे फॉर्मेटिंग अदृश्य स्वरूपातील आहे. यामध्ये लेफ्ट टू राईट आणि राईट तू लेफ्टमधील अंतर समजते. चुकीच्या फॉर्मेटिंग कॅरेक्टरचा वापर केल्याने अॅप क्रॅश होऊ शकते.