Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पलंगावरची चादर बदलण्याची योग्य वेळ कोणती?

vastu bedroom
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (20:35 IST)
काही लोकांना वाटेल की सार्वजनिकरित्या या गोष्टीची चर्चा का करावी? मात्र हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो.
 
किती दिवसात चादर बदलायला हवी या प्रश्नावर कुणाचंही एकमत नाही. इंग्लंडमध्ये 2250 लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यात वेगळ्याच गोष्टी समोर आल्या.
 
तिथल्या अविवाहित मुलांनी सांगितलं की आम्ही कधीकधी चार महिनेसुद्धा चादर बदलत नाही. 12 टक्के लोक तर त्याहीपेक्षा जास्त काळ बदलत नाहीत.
 
लिंडसे ब्राऊनिंग या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते ही निश्चितच चांगली पद्धत नाही.
 
अविवाहित महिलांपैकी 62% बायकांनी दर दोन आठवड्यांनी चादर बदलत असल्याचं सांगितलं. तर जोडप्यांनी दोन ते तीन आठवडे असं उत्तर दिलं.
 
चादर बदलण्याची गरज काय आहे?
 
ब्राऊनिंग यांच्या मते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चादर बदलायला हवी
 
कारण स्वच्छता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला घाम येतो. सध्याच्या उकाड्याच्या दिवसात तर हा प्रश्न किती जटील आहे हे तुमच्या लक्षात येईल
 
चादर न बदलल्यामुळे घाम चादरीत जातो आणि त्याची भयानक दुर्गंधी येते असं ब्राऊनिंग सांगतात.
 
जेव्हा आपण झोपतो तेव्हा हवेशीर वातावरणाची गरज असते. तसंच फक्त घाम नाही तर झोपेत आपली डेड स्कीनही निघून जाते.
 
त्यामुळे चादर बदलली नाही तर चादर डेड स्कीन ने भरून जाईल.
 
ऐकायला भीषण वाटतं ना? आता पुढे ऐका. काही छोटे कीटक त्या मेलेल्या पेशी खातील आणि त्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतं.
 
म्हणजे फक्त घामच नाही तर डेड स्कीन आणि कीटक तुमच्या झोपेच्या वेळी आसपास असतील
 
चादर बदलण्यासाठी ऋतू महत्त्वाचा असतो का?
 
याचं उत्तर हो असं आहे.
 
"थंडीच्या काळात चालू शकतं. पण तरीही आठवड्यातून एकदा बदलायलाच हवी असं ब्राऊनिंग सांगतात.
 
जर तुम्ही दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चादर बदलली नाही तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते.
 
थंडीत घाम येत नसला तरी डेड स्कीनचा विषय आहेच.
 
तसंच तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे हातही खराब होतात. कधी तुम्ही नीट तोंडही धुतलं नसतं, ब्राऊनिंग आठवण करून देतात.
 
या सर्वेक्षणात 18 टक्के लोकांनी सांगितलं की ते झोपण्याधी अंघोळ करतात. त्यामुळे त्यांना चादर बदलण्याची गरज भासत नाही.
 
"उन्हाळ्यात चादर बदलणं फार गरजेचं आहे कारण तिथे अलर्जी आणणारे जंतू येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
 
67 टक्के लोकांनी सांगितलं की ते विसरतात, 35 टक्के लोकांना काळजीच नसते. तर 22 टक्के लोकांकडे धुतलेली चादर नसते. चादर न बदलण्याचे हे मुख्य कारण लोकांनी सांगितलेले असतात. 38 टक्के लोकांना चादर बदलण्याची गरजच वाटत नाही. असं एका सर्वेक्षणात लक्षात आलं आहे.
 
ब्राऊनिंग म्हणतात झोपण्याचा बेड हे तुमचं साम्राज्य आहे. तिथे तुम्हाला छान, आनंदी वाटलं पाहिजे.
 
त्यांच्या काही क्लायंट्स ना निद्रानाशाचा वितकार आहे. त्या म्हणतात, "जर तुमची चादर धुतलेली नसेल, त्याचा वास येत असेल, त्यामुळे तुमची जागा ती नाही असाही विचार येणं स्वाभाविक आहे.
 
त्यामुळे आज झोपताना या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा. ते फार महत्त्वाचं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीजिंगमध्ये आपत्कालीन परिस्थिती, कोरोनाच्या दहशतीमुळे संस्था बंद; इमारती सील केल्या