Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

लग्न मंडपांत महिलेची नवरदेवाला मारहाण

Aita of Uttar Pradesh Woman beats husband in wedding hall
, शुक्रवार, 17 मार्च 2023 (14:02 IST)
उत्तरप्रदेशच्या ऐटा येथे एका तोतया वराचा पुन्हा भोल्यावर चढ़णाचा खेळ त्याच्याच पहिल्या पत्नीने उधळून लावला आणि पहिल्या पत्नी आणि तिच्या भावांनी नवरदेवाला चांगलीच मारहाण केली. 
उत्तर प्रदेशातील ऐटा येथे फसवणूक करून दुसरं लग्न करणाऱ्या दोन मुलांच्या बापाला पहिल्या बायकोने चांगलीच अद्दल घडवली. फसवणूक करून दुसरं  लग्न करणाऱ्या कपिंजल यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितींनुसार, ऐटा येथे आलेल्या कपिंजल यादवचे पहिले लग्न मोठ्या थाटामाटात श्वेता यादव हिच्याशी झाले. श्वेताच्या वडिलांनी लग्नात मोठा खर्च केला असून वराला 20 लाख रुपये देखील दिले होते. कपिंजलला श्वेतापासून दोन मुली  देखील आहेत. काही दिवसांनंतर श्वेताच्या सासरच्या मंडळीच्या वागण्यातून बदल दिसू लागला श्वेता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी आली.

श्वेता माहेरी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळींनी कपिंजलचे दुसरे लग्न करण्याचे योजिले आणि त्याप्रमाणे  ऐटा येथे लग्न ठरवलं .15 मार्च रोजी वरात घेऊन कपिंजल लग्न मंडपात पोहोचला.लग्नाचे विधी होत असताना कपिंजलची पहिली पत्नी श्वेता तिच्या भावांसह आली आणि तिने लग्नाचा विरोध केला . रागाच्या भरात येऊन श्वेता आणि तिच्या भावांनी वराला मारहाण केली आणि गोंधळ घातला. आपल्या मुलीची फसवणूक होत आहे हे पाहून नवी नवरीच्या पित्याने पोलिसांना बोलवून तोतया नवरदेवाला पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Toshakhana Case: न्यायालयाने इम्रान खानविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास नकार दिला