पंजाबमधील फिरोजपूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्ष (BSP) उमेदवार सुरिंदर कंबोज यांच्यावर मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
गुरुहरसहाय येथील जीवा राय गावात मतदान केंद्रावर मतदान करताना एका अज्ञात व्यक्तीने कंबोज यांचा व्हिडिओ बनवला. फिरोजपूरचे उपायुक्त राजेश धीमान यांनी सांगितले की, कंबोज यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केला. कंबोज आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा, 1951 आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंबोज हे आम आदमी पार्टीचे (आप) जलालाबादमधील आमदार जगदीप सिंग गोल्डी कंबोज यांचे वडील आहेत. पंजाबमधील लोकसभेच्या 13 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे.