Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निवडणूक 2024: ही लोकसभा निवडणूक येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलणार - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
, रविवार, 5 मे 2024 (12:27 IST)
सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी सभा घेत आहे. भाजप सध्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सभा आणि प्रचार रॅली घेत आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून ते सातारा लोकसभा मतदार संघचे भाजपचे उमेदवार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या प्रचारासाठी शनिवारी साताऱ्यात पोहोचले.

या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. आणि भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे साताऱ्यातील जनतेला आवाहन केले. 

ते म्हणाले देशात 80 लाख बचत गट तयार करण्यात आले असून त्यांना 8 लाख कोटी रुपये देण्यात आले आहे. बचत गटांच्या माध्यमातून देशातील 10 कोटी महिलांना स्वावलंबी बनवले. 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या. भविष्यात आणखी 3 कोटी महिला लखपती दीदी बनवणार आहे. मोदी सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे. 
 
ते म्हणाले, ही लोकसभा निवडणूक येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलणारी आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मतदान करा. असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
 
 
Edited By- Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, या ठिकाणी यलो अलर्ट