हवामान खात्याने सांगितले की, मंगळवारी सात मे ला पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ, गुजरात क्षेत्र, तामिळनाडू, पॉण्डेचारी, करैकल, उत्तर आंतरिक कर्नाटक मध्ये आता उष्णता असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत उष्ण वातावरण दिसत आहे. अत्यंत उष्णतेमुळे मदानात घट दिसत आहे. तर तरुण देखील उष्णतेमुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येताना दिसत नाही आहे. हवामान खात्याने सांगितले की तिसरा टप्पा देखील उष्णतेने हैराण होईल. ७ ते ९ मे दरम्यान पश्चिम राजस्थान, ६ ते ९ मे दरम्यान सौराष्ट्र, ८ आणि ९ मे राजस्थानचे पूर्व भाग, आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम क्षेत्रात भयंकर उष्णता भडकणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. अनेक राज्य भीषण उष्णतेने त्रस्त झाले आहे. याचदरम्यान मतदान सुरू झाले आहे. अशी शंका वर्तवली जात आहे की, उष्णतेमुळे तिसऱ्या टप्प्यातले मतदान कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की, गंगीय पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, झारखंड या राज्यांच्या काही भागांमध्ये आता उष्णता भडकलेली दिसते. इथे तापमान सामन्यापासून ४-७ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचेल.
हवामान खात्याने कर्नाटक मधील १४ जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' घोषित केले आहे. जिथे सात मे ला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. असे तेव्हा झाले आहे जेव्हा तापमान काही दिवसांमध्ये ४२ ते ४४ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढेल.
Edited By- Dhanashri Naik