Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निवडणूक 2024: मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर

voters
, बुधवार, 27 मार्च 2024 (12:43 IST)
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर केल्या आहे. यंदा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांत मतदान प्रक्रिया होणार आहे. या दिवशी निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना एक दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहे आणि या जागेसाठी 5 टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या साठी कर्मचाऱ्यांना भरपगारी एक दिवसाची रजा किंवा दोन तासांची सवलत देणं बंधनकारक आहे. या संदर्भात राज्य सरकार ने एक परिपत्रक काढले आहे. या शासन परिपत्रकात लिहिले आहे की लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 135 ब नुसार ,मतदानाच्या दिवशी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा या साठी  त्यांना भरपगारी सुट्टी देणे किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. काही आस्थापना किंवा संस्था भरपगारी सुट्टी किंवा सवलत नाही दिल्याचे आढळून आले आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे. यानुसार, उद्योग विभांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, आणि संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य पालन करण्याची खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी किंवा मतदानासाठी योग्य सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करण्यास शक्य नसल्यास या बाबत तक्रार  आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल असे या परिपत्रकात म्हटले आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळी स्पेशल ट्रेनच्या एसी कोचला भीषण आग,सुदैवाने जीवितहानी नाही