लोकसभा निवडणुकाच्या तारख्या जाहीर झाल्या आहे. निवडणुका 7 टप्प्यात होणार आहे. प्रत्येक जण जो मतदान करण्याचा अधिकारी आहे आपला हक्क बजावणार. पण देशभरात अनेक जण आहे ज्यांना राहण्यासाठी घर नाही. ते बेघर आहे अशा लोकांना देखील आता मतदान करता येणार आहे. बेघरांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक सोपा आणि नवीन पर्याय सुचवला आहे. आता 18 वर्षावरील असलेले बेघर नागरिक मतदार देखील नोंदणी करू शकतील. या साठी त्यांना फॉर्म क्रमांक 6 भरावा लागणार. निवडणूक आयोग नवीन मतदार म्हणून फॉर्म 6 भरून घेते. ज्यां रहिवाशीना पत्ता बदलायचा आहे ते देखील फॉर्म 6 भरून दुरुस्ती किंवा बदल करू शकतात. त्या मुळे आता बेघर नागरिकांना नवीन मतदार म्हणून फॉर्म 6 भरावा लागणार.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळ www.eci.gov.in ला भेट देऊन किंवा वोटर हेल्पलाईन मोबाईल अँप (Voter Helpline Mobile App)चा वापर करून बेघर नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार. पत्ता मध्ये सुधार करायचा असल्यास नागरिकांना नाव, वय, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण, पत्ता, मेल आयडी, मोबाईल क्रमांक, अशी माहिती देऊन आधार कार्ड , पेन कार्ड अपलोड करावे लागणार, बेघर असल्यास त्या त्या ठिकाणाची पाहणी बूथ स्थळावरील अधिकारी करतात. त्या नंतर बेघर नागरिकांना पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार नाही.
नागरिकांनी फॉर्म 6 भरल्यावर जमा करायचे आहे. जमा केल्याच्या 30 दिवसांत मतदान कार्ड येईल. फॉर्म जमा केल्यावर लिंक मेल वर येईल लिंक क्लिक केल्यावर मतदान कार्डाची प्रक्रिया कुठे आली आहे हे समजेल.
निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपाय योजना करत आहे. मतदानासाठी नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे कार्य शेवटच्या टप्प्या पर्यंत होणार आहे. जेणे करून जास्तीत जास्त मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास मदत होईल.