पुणे :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.यामध्ये तिरंगी आणि दुरंगी लढती होणार आहेत.महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
पुणे शहर लोकसभा मतदार संघात महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आणि मनसे मधुन बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसे मधून बाहेर पडल्यावर मोरे यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता पण अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे यापूर्वी त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली होती.
तर शिरूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याच्यात तिरंगी लढत होणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात होर्णार्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला पांिठबा जाहीर केला आहे तर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भावजय आणि नणंद अशी लढत होत असल्याने उत्सुकता वाढली आहे तर मावळ लोकसभा मतदार संघात आतातरी दोन उमेदवार समोरा समोर उभे असल्याचे दिसते आहे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे पाटील यांच्यामध्ये लढत रंगणार आहे.
उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे पण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर प्रचार मोहिमेला अधिक वेग येणार आहे.
Edied by Ratnadeep Ranshoor