धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पाटसांगवी या ठिकाणी दुपारी 12 च्या सुमारास चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना वैयक्तिक वादावरून घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर ही हत्या वैयक्तिक नसून राजकीय वादातून झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील भूम तालुक्यात पाटसांगवी येथे दोन गटात मंगळवारी राडा झाला. मतदार आणण्यावरून हा वाद झाला नंतर या वादातून दिन गटात आपसात भांडण झाले आणि चाकूने वार करत एकाची हत्या करण्यात आली. तर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन गटात हा वाद सुरु होता. या वादात समाधान पाटील याचा खून झाला असून गौरव नाईकनवरे या तरुणाने खून केला असून तो सध्या पसार झाला आहे. तरुणाचा मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. राजकीय वादातून हा खून झाल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या हत्येमुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचे सांगितले जात आहे. तरुणाच्या हत्येमुळे भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.