आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 11 मतदार संघावर झाली असून त्यात बारामती मतदार संघाचा समावेश होता. आता महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या शिरूर मध्ये जाहीर सभा घेणार आहे.
शरद पवार यांची जाहीर सभा शिरूर येथे पाच कंदील चौकात दुपारी 1 वाजेच्या सुमारास होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे.
औतुरच्या सभेत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 15 वर्षाच्या खासदारकीच्या कामाचा पाढा वाचला. कोल्हे यांनी शिवाजी राव आढळराव पाटीलांवर हे स्वतःच्या कम्पनीला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने संसदेत संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी पुरावा देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी विश्रांती घेण्यासाठी दोन दिवसांच्या जाहीर सभा आणि दौरे रद्द केले असून आता ते पुन्हा सभा घेण्यासाठी एक्टिव्ह झाले असून महाविकास आघाडीचे शिरूरचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे यांच्या साठी घेणाऱ्या आता उद्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार आणि अमोल कोल्हे कोणते गौप्यस्फोट करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.