Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहित पवार यांचे ट्विटमध्ये एका दगडात दोन पक्षी; वाचा काय लिहिलंय त्यात

rohit panwar
, शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:33 IST)
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीत नवीन पक्ष दाखल होण्याची चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांचा मनसे महायुतीत येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट केले आहे. महाराष्ट्रात मनसेसोबत अन् तामिळनाडूत भाजपने सहा पक्षांसोबत युती केली असल्यामुळे रोहित पवार यांनी टीका केली आहे.
 
ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय, असा टोला राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांचा भाजपसह अजित पवार यांना टोला लगावला.
 
असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष “नया_है_वह” असेच म्हणत असतील.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता