Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाकरे गटाच्या विद्यमान खासदाराला भाजपाकडून तिकीट

uddhav thackeray
, गुरूवार, 14 मार्च 2024 (11:48 IST)
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 70 जणांची नावे आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 20 जणांची नावे आहे. या मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. कलाबेन डेलकर यांना भाजपने दादरा व नगर हवेलीची उमेदवारी दिली आहे. कलाबेन डेलकर  यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा 2021  मध्ये मृत्यू झाला. पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिले होते तर शिवसेना ठाकरे गटाकडून कलाबेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.
या निवडणुकीत कलाबेन विजयी झाल्या होत्या. त्या आता पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटात होत्या. त्यांनी भाजपच्या पक्षात प्रवेश केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा न करता भाजपने त्यांना तिकीट दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. 
 
नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगांवमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारेे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.कर्नाटकात चिकोडीमधून अण्णासाहेब जोल्ले, विजापूरमधून रमेश जिगजिनगी, गुलबर्ग्यातून उमेश जाधव यांना संधी मिळाली आहे. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिकीट देण्यात आले आहे. धारवाडमधून प्रल्हाद जोशी तर म्हैसूरमधून यदुवीर वाडियार यांना संधी मिळाली आहे.
 
बंगळुरू उत्तरमधून शोभा करदलांजे यांना बंगळुरू दक्षिणमधून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकातील 26 जागांची यादी यामध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूरमधून अनुराग ठाकूर, शिमल्यातून सुरेश कश्यप यांना संधी देण्यात आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन कमी करण्यासाठी दररोज 16 तास उपाशी राहणं फायद्याचं की तोट्याचं?