लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसहिंता १४ आणि १५ मार्च पासून लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग लवकरच जाहिर करेल अशी माहिती मिळाली. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया एप्रिलच्या दुसऱ्या आठवडयात सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळीही निवडणूक सात टप्प्यात घेतली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच निवडणूक अयोगकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. म्हणूनच निवडणूक आयोग या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत आहे. तसेच निवडणूक आयोग कोणत्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत आहे, हे समोर आलेले नाही. तसेच लोकसभेच्या तारखा या पत्रकार परिषदेत जाहिर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवडयात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहिर करू शकते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोग घेत आहे म्हणून निवडणूक आयोग अनेक राज्यांचा दौरा करत आहे व सर्व राज्यांचा तयारीचा आढावा घेऊन मग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर होतील. तसेच निवडणूक आयोगाची टीम सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. तसेच यानंतर उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर राज्यांचा दौरा केला जाईल. व १३ मार्च पर्यंत हा दौरा पूर्ण होईल.
Edited By- Dhanashri Naik