Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अडवाणी दुसरे वल्लभभाई पटेल- मुंडे

अडवाणी दुसरे वल्लभभाई पटेल- मुंडे

वेबदुनिया

मुंबई , रविवार, 5 एप्रिल 2009 (21:46 IST)
देशात दहशतवाद वाढला आहे. दहशतवाद मोडून काढण्याचे काम येड्या गबाळ्यांना जमणार नसून, त्यासाठी युतीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे दुसरे रूप असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.

भाजप आणि सेनेने आज शिवाजी मैदानावर संयुक्त सभा घेत कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर तोफ डागली. या प्रसंगी बोलताना मुंडे यांनी आर आर आबांसह केंद्र सरकारचीही खिल्ली उडवली.

कॉग्रेस सरकार सत्तेवर असताना अनेक स्फोट झाले, भाजपचे सरकार सत्तेवर होते तेव्हा एकही स्फोट झाला नाही किंवा दंगल उसळली नसल्याचे ते म्हणाले.

देशातून दहशतवाद संपवायचा असेल तर त्यासाठी केवळ भाजप सेना युतीचेच सरकार एकमेव उपाय असून, जनतेने युतीला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi