Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉग्रेसशी फारकतीचे पवारांचे संकेत

कॉग्रेसशी फारकतीचे पवारांचे संकेत

भाषा

तिसऱ्या आघाडीसह बीजू जनता दलाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाने विरोधकांऐवजी कॉग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील नेत्यांना धडकी भरली आहे.

तिसऱ्या आघाडीत आपण जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही पवार यांनी भुवनेश्वरमध्ये झालेल्या सभेत माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासमवेत प्रचारसभा घेतली. तूर्तास कॉग्रेसशी आघाडी असली तरी निवडणुकांनंतर संपुआमध्ये जाणे बंधनकारक नसल्याचे सांगत त्यांनी कॉग्रेसशी फारकत घेण्याचे संकेत दिले आहेत.

जागा वाटपापासूनच पवार यांनी कॉग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून, तिसरी आघाडी स्थापन झाल्यानंतर पवार यांनी सारे पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi