Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोविंदाचा पत्ता कट; नगमा इच्छुक

गोविंदाचा पत्ता कट; नगमा इच्छुक

भाषा

मुंबई , सोमवार, 30 मार्च 2009 (12:26 IST)
चित्रपट अभिनेता गोविंदा लोकसभा निवडणूक लढविणार नाही. परंतु गोविंदा ऐवजी नगमाने उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रदेश कार्यालयात पत्रकरांशी बोलतांना श्री.चव्हाण यांनी सांगितले की, गोविंदाला ‍लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. परंतु त्याने नकार दिला. आता उत्तर मुंबईतून नगमाने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत पक्ष नेतृत्व लवकरच निर्णय घेणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi