लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि रामविलास पासवान यांच्या चौथ्या आघाडीला आता दक्षिणेतूनही बळ मिळाले आहे. आंध्र प्रदेशमधील 'प्रजाराज्यम' पक्षाचा प्रमुख व अभिनेता चिरंजीवी याने या आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह व संजय दत्त यांची सोमवारी रात्री हैदराबादमध्ये भेट घेतल्यानंतर चिरंजीवीने आपला पाठिंबा जाहीर केला. 'मी राष्ट्रीय पातळीवर कुणाला पाठिंबा देऊ याचा विचार करतच होतो. मग चौथ्या आघाडीला का नाही, असा विचार करून मी त्यांना पाठिंबा जाहीर केला, असे त्याने सांगितले. समविचारी पक्षांची मोट बांधण्यासाठी येथे आल्याचे अमरसिंह यांनी यावेळी सांगितले.