Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल- अडवाणी

जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल- अडवाणी

वेबदुनिया

मुंबई , रविवार, 5 एप्रिल 2009 (21:48 IST)
यंदा जनतेचा मूड भाजप बाजूने आहे. युतीचे सर्व उमेदवार मुंबईतून निवडून येतील. यापूर्वी 1993 मध्येही मुंबईवर दहशतवादीहल्ला झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता झाली असून, जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल असा इशारा देत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली.

मुंबई हल्ल्यांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्यांची शक्यता व्यक्त केल्यानंतरही हल्ला झाला ही शरमेची बाब असल्याचे ते म्हणाले.

न्यूयॉर्कच्या डब्ल्यूटीओवर झालेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वाधीक मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगतानाच अमेरिकी सरकारने या हल्ल्यांच्या चौकशीसाठी एका समितीचे गठण केले होते. हल्ला कसा झाला याची संपूर्ण चौकशी या समितीने केली.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर केंद्र सरकारने या हल्ल्यांच्या चौकशीसाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे आरोप अडवाणींनी आपल्या भाषणात केले.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यांची संपूर्ण चौकशी करावी तसेच, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्‍याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

1993 साली झालेल्या हल्ल्यांपेक्षाही मुंबईवर झालेला हल्ला हा अधिक भयानक असल्याचे सांगत पुन्हा अशा प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी केंद्र सरकारने जनतेला खात्री देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

यासाठी येणार्‍या काळात केंद्र सरकारला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी मतदारांनी सेना भाजपच्या सार्‍या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi