Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिकट कापलेल्या गोविंदाच्या स्वपक्षीयांवर दुगाण्या

तिकट कापलेल्या गोविंदाच्या स्वपक्षीयांवर दुगाण्या

भाषा

मुंबई , सोमवार, 30 मार्च 2009 (15:29 IST)
आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर खापर फोडून खासदार गोविंदाने लोकसभा निवडणूक लढविण्याची 'अनिच्छा' आज अखेर एकदाची जाहीर करून टाकली. निष्क्रिय खासदार असे 'बिरूद' मिळवलेल्या गोविंदाला उमेदवारी मिळू नये अशी फिल्डिंग कॉंग्रेसमधूनच लावण्यात आली होती. त्यामुळे त्याला यंदा तिकीट मिळणारच नव्हते. मात्र, पक्षीय नेत्यांच्या कारवायांमुळे आपली निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याची मखलाशी गोविंदाने केली आहे.

गेल्या वेळी आपल्या स्टारडमच्या जोरावर राम नाईक यांच्यासारख्या कर्तबगार उमेदवाराला धुळ चारून गोविंदा निवडून आला होता. मात्र, गेल्या पाच वर्षात काहीही काम न केल्याने जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे त्याला तिकिट देऊच नये अशी पक्षातूनच मागणी होत होती. त्यामुळे आपली निवडणूक लढविण्याची अनिच्छा जाहीर करताना गोविंदाने या सगळ्यांवर खापर फोडले नसते तरच नवल. ' पक्षाच्या काही नेत्यांना आपल्या बरोबर काम करण्यात अडचण होत होती. त्यांनीच माझ्या कामात अडथळे आणले. त्यामुळेच मी निवडणूक लढविण्यापेक्षा पक्षाचा प्रचार करीन असे सोनिया गांधींना कळविल्याचे त्याने सांगितले.

माझी प्रतिमा मलीन करून मला बदनाम करणार्‍या माझ्या विरोधकांपेक्षा सोनियांचा माझ्यावर विश्वास आहे, असे सांगून माझ्या खासदारकीच्या काळात मी रेल्वे, झोपडपट्टी, पाणीपुरवठा यासारखे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस पक्षातील नेत्यांच्या 'बकवासबाजीचा' मी बळी ठरलो. माझ्या चांगल्या कामाबद्दल कुणी माझे कौतुकही केले नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

संजय दत्तसाठी प्रचार करणार काय असे विचारले असता, नक्की करेन. पण याचा अर्थ मी कॉंग्रेस सोडेन असा होत नाही, हे सांगायलाही गोविंदा विसरला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi