Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजकारण हे गंभीर माध्यम- प्रकाश झा

राजकारण हे गंभीर माध्यम- प्रकाश झा

वार्ता

पाटणा साहिबमध्ये परस्परांविरोधात उतरलेल्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हा व शेखर सुमन यांना चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वतः झा बिहारमधील बेतिया मतदारसंघातून लोकजनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. चित्रपट अभिनेते केवळ 'चमकोगिरी' करण्यासाठी राजकारणात उतरत असतात काय असे विचारले असता, ही बाब सगळ्यांसाठी खरी नसते, असे सांगून लोकांमध्ये काम करून ओळख निर्माण केलेले अनेक कलावंत राजकारणात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकारण हे आपल्या मायभूमीसाठी व तेथील रहिवाशांसाठी गंभीरपणे काही करू पाहण्याचे माध्यम असल्याचे मी स्वतः मानतो, असेही ते म्हणाले.

दामूल या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त फिल्मनंतर झा यांनी कमर्शियल व आर्टचा संकर करून अनेक फिल्म्स केल्या. त्या गाजल्याही. आता ते राजनीती ही फिल्म बनवत आहेत. ज्यात कतरीना कैफही आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi