Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळेंविरोधात कांता नलावडे

सुप्रिया सुळेंविरोधात कांता नलावडे

वार्ता

उत्तर मध्य मुंबई व बारामती मतदारसंघांसाठी भाजपला अखरे उमेदवार सापडला आहे. उत्तर मध्य मुंबईतून पक्षाने प्रख्यात वकिल महेश जेठमलानी यांना, तर बारामतीतून माजी आमदार कांता नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. कल्याणच्या जागेसाठी आग्रही असणार्‍या भाजपला उमेदवार सापडत नव्हता. मात्र, अखेर पक्षाला माजी खासदार जगन्नाथ पाटील यांच्याकडेच वळावे लागले आहे.

उत्तर मध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच जागेवरून राम जेठमलानी १९७७ मध्ये लोकसभेत गेले होते. मात्र, १९८४ मध्ये त्यांना सुनील दत्त यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. आता जेठमलांनीचे चिरंजीव व सुनील दत्त यांची कन्या असा सामना होईल. ५२ वर्षीय महेश स्वतः वकिल आहेत. शिवाय ते भाजपशी निगडीत आहेत.

बारामतीतून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपला उमेदवार मिळत नव्हता. अखेर पक्षाने माजी आमदार कांता नलावडे यांना उतरवले आहे. पवारांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात नलावडे किती झुंज देताच एवढाच प्रश्न आहे.

भाजप राज्यात २६ जागा लढवत आहे. मात्र, अजूनही लातूर व सांगली येथून पक्षाला उमेदवार मिळालेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi