भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
जगदीप मर्चंट नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून, अडवाणींनी गांधीनगरमध्ये आल्यानंतर निवडणुक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी टी नटराजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.