सीधी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह यांची कन्या वीणा सिंह यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. असे असले तरीही आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने गरज वाटल्यास आपण मुली विरोधात प्रचार करणार अशी भूमिका सिंह यांनी जाहीर केली आहे.
अर्जुन म्हणाले, की कन्या वीणा सिंह आणि पुत्र अजय सिंह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आपल्याला दुःख झाले असले तरीही पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी नाराजी जाहीर करून शकत नाही. उमेदवारी कुणाला द्यावी हा पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे. या मतदार संघातून मी पक्षाचा प्रचार करण्यास बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.