Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉंग्रेसच्या 'जय हो'ला भाजपचे 'भय हो'

कॉंग्रेसच्या 'जय हो'ला भाजपचे 'भय हो'

वेबदुनिया

नवी दिल्ली , शनिवार, 28 मार्च 2009 (17:31 IST)
कॉंग्रेसने 'स्लमडॉग मिलनियरचे 'जय हो' गीत घेऊन लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मनसुबा रचलेला असताना भाजपने त्याला 'भय हो' असे उत्तर देऊन कॉंग्रेसच्या प्रचारातील हवा काढण्याचा उद्योग सुरू केला आहे. भाजपने 'भय हो' हे विडंबन गीत तयार केले असून त्याचा प्रचारात उपयोग करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.

भाजपचे प्रवक्ता सिद्धार्थ नाथ सिंह यांनी ही माहिती दिली. हैदराबादमध्ये रस्त्यावर गाणार्‍या मुलांच्या गाण्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्याने डॉक्युमेंटरी तयार केली असून पक्षाने ती स्वीकारली आहे. तिचा प्रचारात उपयोग करण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. हैदराबादमधील मुले हे गाणं गाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. भाजपच्या मुख्यालयात हे गाणे आज पत्रकारांना ऐकविण्यात आले. हे गाणे असे आहे.

'आजा आजा वोटर इस झांसे के तले
आजा आजा झुठे मूठे वादे के तले
भय हो भुख हो
रत्ती रत्ती सच्ची हमने जान गवाई है
भूखे पेट जाग रात बिताई है
मंदी की मार में नौकरी गवां दी
गिन गिन वादे हमने जिंदगी बिता दी...
मंदी हो1 आतंक हो1 महंगाई हो1

भय हो.... फिर भी जय हो....1

Share this Story:

Follow Webdunia marathi