निवडणूक आल्यानंतर आश्वसनांचा पाऊस पडणे सुरू झाले आहे. पण दक्षिणेतील आश्वसनांची परंपराच काही वेगळी आहे. इथे रंगीत टिव्ही, दोन रूपयांत तांदूळ, शंभर रूपयात किराणा सामान देण्याबरोबर आता तर थेट रोख रक्कम लोकांना देण्याचे आश्वासन देण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेली आहे.
तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी या सर्व आश्वासनांवर कडी करून निवडणुकीनंतर सत्ता आल्यास थेट रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. या कॅश ट्रान्सफर स्क्रीममध्ये (सीटीएस) गरीबातील गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यात महिन्याला दीड हजार रूपये तर गरीबातील मध्यमवर्गीयांना हजार रूपये जमा करण्यात येतील.
ही घोषणा केवळ सत्ता मिळविण्याचे साधन म्हणून आपण केलेली नाही, असे सांगून आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी आणली आहे. गरीबांच्या दोन घासांची आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही योजना आणण्याचा विचार असल्याचे चंद्राबाबू म्हणाले.
गरीबांना रंगीत टिव्ही वाटण्याची योजनाही त्यांना मनोरंजनाची संधी निर्माण करून देणे ही होती, असेही ते म्हणाले.