लोकसभा निवडणुकी दरम्यान अंध मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएमवर ब्रेल लिपीचे स्टिकर लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान केंद्रावर नेत्रहीन मतदारांना ब्रेल लिपीची मतदान पत्रिका दिली जाईल. मतदार तिला स्पर्श करून उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक चिन्हाबद्दल माहिती घेऊ शकणार आहे.
त्यानंतर असे मतदार ईव्हीएमवर लावण्यात आलेल्या खास स्टिकरच्या मदतीने मतदान करू शकणार आहे. या स्टीकरवरही ब्रेल लिपीचा वापर केला जाणार आहे.