Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या बालेकिल्ल्यात केजरीवालांचा 'रोड शो'; दिल्लीत 'आप'चा राडा

मोदींच्या बालेकिल्ल्यात केजरीवालांचा 'रोड शो'; दिल्लीत 'आप'चा राडा
अहमदाबाद/दिल्ली , गुरूवार, 6 मार्च 2014 (11:42 IST)
आम आदमी पक्षाचा (आप)'रोड शो'गुजरात पोलिसांनी रोखून अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याने तीव्र पडसाद दिल्लीत उमटले. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला. भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक केली.त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 
 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या गुजरातमध्ये आपच्या 'रोड शो'ला परवानगी नसल्याचे कारण दाखवत केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्यामुळे 'आप'च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेचे तीव्र पडसाद दिल्लीत तत्काळ उमटले. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. नरेंद्र मोदींच्या विरोधात निदर्शने केली. यादरम्यान, भाजप आणि 'आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली.
यावेळी 'आप'चे नेते आशुतोष आणि शाजिया इल्‍मी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. निदर्शनादरम्यान 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात बेकायदा प्रवेशही करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात तोडफोड केली. याशिवाय भाजप कार्यालयावर दगडफेकही केली.
 
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. तेथेही त्यांच्या जाहीर सभा झाल्या. मात्र, त्यांची सभा रोखण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. गुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो का रोखण्यात आला? केजरीवाल यांचा रोड शो पूर्वनियोजित होता. त्यामुळे केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घ्यायला नको होते, असे  आपच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi